Description
Alibag Chicken Biryani Pre-Mix 55 gm
अलिबाग पर्यटन विकास (Alibag Paryatan Vikas LLP)
Present
- Pre-Mix for Instant Cook
- No Added Coloured
- No Preservatives
- 100% Home Made
Instructions
- Store in Dry and Cook Place
- Store in Air Tight to increase self life
- Recommend to use complete pack once open
Making of Alibag Pre-Mix Chicken Biryani
साहित्य – चिकन ५०० ग्रॅम, तांदुळ ५०० ग्रॅम, दही १०० ग्रॅम, दोन मोठे टोमॅटोची प्युरी, आले लसूण पेस्ट, हळद मीठ, दोन मोठे कांदे, कोथिम्बिर, पुदिना
बिर्याणी करिता कृती
- प्रथम एका बाऊल घ्या, त्या मध्ये अलिबाग बिर्याणी प्री- मिक्स ५० ग्रॅम, दही आणि आले लसूण पेस्ट, थोडं हळद मीठ घालुन पेस्ट करा, त्यात ५०० ग्रॅम चिकन घालुन किमान अर्धा तास मॅरीनेट करण्यास ठेवा.
- दुसऱ्या बाऊल मध्ये ५०० ग्रॅम तांदुळ घेऊन एक तास पाण्यात भिजत ठेवणे.
तांदुळ शिजवण्याची पद्धत
- प्रथम एका टोपात पाणी उकळून घेणे व त्यात २ तमाल पत्र, ४ लवंग, ४ काळीमिरी, चवी नुसार मीठ, ३ बारीक वेलची, १ मोठी वेलची थोडं तेल व भिजत ठेवलेला तांदुळ टाकुन भात साधारण ९०% शिजवुन घ्या.
चिकन शिजवणे
- गॅस चालु करून कढई ठेवणे त्यात ४ मोठे चमचे तेल घेउन गरम करणे,
- त्याच तेलात कांदा उभा पातळ चिरून लालसर होईपर्यंत परतणे व काढुन घेणे
- त्यात टोमॅटो प्युरी टाकुन २ मिनटे परतुन घ्या.
- मॅरीनेट करून ठेवलेले चिकन कढईत टाकणे व १५ ते २० मिनटे शिजवुन घेणे
बिर्याणी कृती
- कुकर अथवा टोपामध्ये शिजलेल्या चिकनवर वरिल शिजवल्या भाताचा थर लावणे
- त्यावर थोडं केशर दूध टाकुन, कोथांबीर, पुदिना आणि तळलेला कांदा याचा थर लावावा
- घट्ट झाकण बसवुन मंद गॅसवर साधारण १० मिनटे ठेवावे.
अलिबाग स्पेशल चिकन दम बिर्याणी तयार
Reviews
There are no reviews yet.